Dilkhulas : Sanvad Bollywoodmadhalya Junya - Navya Kalakaranshi | दिलखुलास : संवाद बॉलीवूडमधल्या जुन्या - नव्या कलाकारांशी

Dilkhulas : Sanvad Bollywoodmadhalya Junya - Navya Kalakaranshi | दिलखुलास : संवाद बॉलीवूडमधल्या जुन्या - नव्या कलाकारांशी
चंदेरी दुनियेतले हे चमचमणारे तारे कोणी एका रात्रीत 'स्टार 'होतो ;तर कोणाला वर्षानुवर्षं झगडूनही यश हुलकावणी देत राहतं. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनयाचा ' शहेनशाह ' इथे जन्माला येतो,तर किंग खान बनून कोणी तरुण - तरुणींना भुरळ घालतो. कोणाची कारकिर्द दशकानुदशकांची असते , तर कोणाची काही आठवड्यांची ... चेहरे आणि मुखवटे यांचं इतकं बेमालूम नातं असतं की ,खरं काय आणि खोटं काय,हे कोणीच सांगू शकत नाही. या मायावी दुनियेतल्या म्हणजे बॉलीवूडमधल्या तारे-तारकांचं वलयांकित आयुष्य आभासी भासत असलं,तरी तितकंच वास्तववादी आणि हवंस वाटणारं ... त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यात सर्वांनाच रस असतो. एंटरटेनमेंट च्या नावाखाली त्यांच्या 'गॉसिप' च्या चर्चा सर्वत्र रंगतात ... उमेदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज कलाकार ... आणि स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी तरुणाई अशा जुन्या - नव्या कलाकारांशी मुलाखतकार पूजा सामंत यांनी साधलेला संवाद !