Disale Te | दिसले ते
Disale Te | दिसले ते
' दिसले ते' हे पुस्तकाचे शीर्षकच आशय स्पष्ट करणारे आहे. सर्वसाधारणपणे आपल्यापैकी अनेकांच्या नजरांना पुस्तकातील विषय केव्हा ना केव्हा भिडलेले असले, तरी ही चित्रे वाचताना लेखकाची वेगळी नजर जाणवत राहते. आपणही खूप पाहतो, अनुभवतो; पण ते थेटपणाने व्यक्त करीत नाही. लेखकाने या अनुभवांना शब्दरूप दिले आहे. अर्थातच त्यासाठी आवश्यक असणारी ताजी, प्रवाही आणि साधी-सोपी शैली लेखकाकडे आहे. या शैलीत अभिनिवेश नाही. पांडित्याचा आव नाही. अनुभवांची व्यापकता उलगडून दाखविण्याचा सोस नाही. जे दिसले ते, जे अनुभवले ते अगदी तसेच मांडणे, एवढी साधी भूमिका या सार्याच लेखनामागे आहे.