Divyatvachi Jethe Prachiti | दिव्यत्वाची जेथे प्रचिती

Divyatvachi Jethe Prachiti | दिव्यत्वाची जेथे प्रचिती
जागाच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकरुप होऊन ‘दत्तावतार’ घेतला. कलियुगात दत्त भक्ती श्रेष्ठ मानली आहे. गुजरात मधील जुनागढजवळचा गिरनार पर्वत हे दत्तमहाराजांच्या जागृत स्थानांपैकी एक. दहा हजार पायर्याग व साडेतीन हजार फूट उंची चढून गेल्यावरच स्वयंभू दत्त पादुकांचे दर्शन होते श्रद्धेची कसोटी पाहणार्याच गिरनार यात्रेचे महत्त्व प्राचीन काळापासून आहे श्री. प्रमोद केणे, विज्ञानाचे पदवीधर, संसारिक व एक छोटे उद्योजकही. दत्तभक्तीची ज्योत अंतरी निर्माण होऊन, १-२ नव्हे तर चक्क १०८ गिरनार यात्रा त्यांच्याकडुन घडल्या. त्याही कशा? तर, सलग, अखंडित, दर पौर्णिमेला, रात्रीच पर्वत चढून, कडाक्याची थंडी, तीव्र उन्हाळा कोसळता पाऊस, धंद्यातील संकटे तीव्र आर्थिक अडचणी, कशाचीही पर्वा न करता. भगवत्कृपेच्या आड येणारी बंधने तोडणे हीच साधना. श्रद्धा-भक्ती यांच्या बळावर आपण काय करु शकतो याचे उदाहरण.