Dnyanasuryache Akash : Sant Nivruttinath | ज्ञानसूर्याचे आकाश : संत निवृत्तीनाथ

Dnyanasuryache Akash : Sant Nivruttinath | ज्ञानसूर्याचे आकाश : संत निवृत्तीनाथ
समाजाने वाळीत टाकलेल्या एका ज्ञानसंपन्न कुटुंबातील मोठा मुलगा, आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर ज्ञानदेवादी भावंडांचा सांभाळ करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मोठा भाऊ आणि गुरू, गहिनीनाथांकडून नाथसंप्रदायाची दीक्षा घेणारा हठयोगी आणि भागवत संप्रदायाची ध्वजा पुन्हा एकदा सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी सर्व जातिजमातीतील संतांना एकत्र करण्याचा विचार करणाऱ्या ज्ञानदेवांना सक्रिय पाठिंबा देणारे गुरुवर्य.. अशा अनेक अर्थांनी निवृत्तिनाथांकडे पाहण्याचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. मात्र, लेखिकेला सर्वाधिक स्पर्शून गेले ते जीवनकार्य पूर्ण होताच एकामागून एक समाधी घेणाऱ्या धाकट्या भावंडांना निरोप द्यावा लागलेल्या निवृत्तीचे एकाकीपण. या अलौकिक व्यक्तिमत्त्वाकडे मानवी जाणिवेतून पाहणारी, मनाला भिडणारी कादंबरी.