Dnyanmurti Govind Talwalkar | ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर

Dnyanmurti Govind Talwalkar | ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर
तळवलकरांना सिद्धहस्त अभिजात लेखक,प्रतिभावान,द्रष्टा,संशोधक इतिहासकार,प्रभावी,उदारमतवादी आणि द्रष्टा संपादक या नात्याने सर्वजण ऒळखतात.ते अतिशय प्रसिद्धीपराङ्मुख होते.‘टिळकयुगा’ नंतर ‘तळवलकरयुग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते.त्यांचा जीवनपट,त्यांचे वाचन,लेखन,बागकाम व पशुपक्ष्यांची आवड या पुस्तकात आहे.असामान्य बुद्धिमत्ता,विद्वत्ता,ज्ञानोपासना,विचारसौष्ठव,भाषासौष्ठव,वैचारिक सहिष्णुता,संयम इत्यादी वैशिष्ट्यांमूळे ग. दि. माडगूळकर त्यांना ‘ज्ञानमूर्ती’ असे संबोधत.या पुस्तकात गोविंद तळवलकरांच्या व्यक्तिमत्वातील अनेकविध पैलूंचा परिचय करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या मुलींनी केला आहे.