Dnyanpith Lekhika | ज्ञानपीठ लेखिका

Dnyanpith Lekhika | ज्ञानपीठ लेखिका
ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. भारतात मान्यताप्राप्त बावीस भारतीय भाषा आहेत. या भाषांपैकी एका भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्याचा दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. विविधतेतून एकता साधली जाते. १९६५ पासून २०१६ पर्यंत एकूण सत्तावन्न साहित्यिकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पण गेल्या बावन्न वर्षात फक्त सात लेखिकांनाच हा पुरस्कार मिळाला आहे.या सातपैकी आशापूर्णादेवी, महाश्वेतादेवी या दोघी बंगाली, महादेवी वर्मा - हिन्दी, अमृता प्रीतम - पंजाबी, कुर्रतुल ऐन हैदर उर्दू, इंदिरा गोस्वामी - आसामी आणि प्रतिभा राय - उडिया भाषिक लेखिका आहेत. या साऱ्या भारतीय भाषा-भगिनी आहेत. यांच्या साहित्याची आपल्याला थोडीतरी ओळख व्हावी, तसेच त्या त्या भाषिक समाजाचे कौटुंबिक, सामाजिक जीवन, त्यांच्या रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा, विशेषत: स्त्रीजीवन समजून घेण्यासाठी हे पुस्तक मदतपूर्ण ठरू शकेल.