Dnyanpith Purskarit Pratibha : Natyatma-Darshne |ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा : नाट्यात्म-दर्शने

Dnyanpith Purskarit Pratibha : Natyatma-Darshne |ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा : नाट्यात्म-दर्शने
विंदा करंदीकर, कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर आणि वि. स. खांडेकर या तीन ज्ञानपीठकारांच्या साहित्यावर आधारित तीन नाटकं रचण्याचा प्रयत्न प्रा. मधु पाटील यांनी केला आहे. खरं तर हे तीन दीर्घांक आहेत. या दीर्घांकात मधु पाटील यांनी ज्ञानपीठकारांच्या लेखनामागच्या प्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या तीन श्रेष्ठ साहित्यिकांनी निर्माण केलेल्या पात्रांचाच आधार घेऊन लेखकाने त्यांच्याच तोंडून त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला आहे. यामध्ये त्यांच्या गाजलेल्या कविता, नाटकातील उतारे व इतर साहित्यही घेतले आहे. 'विंदा दर्शन' या दोन अंकी नाटकात सामाजिक कविता, प्रेमकविता, विनोदी विरूपिका, बालकविता आणि गंभीर तत्त्वज्ञानपर कविता या नटी, सूत्रधार, भटजी, कविपत्नी, कविमित्र व प्रवक्ता या पात्रांच्या संवादातून उलगडत जातात. 'कुसुमाग्रज काव्य-नाट्य दर्शन' या नाटकात कुसुमाग्रजांच्या कविता आणि त्यांनी लिहिलेल्या नाटकातले काही प्रसंग सूत्रधार, समीक्षिका, कविमित्र व शाहीर या पात्रांच्या मार्फत त्यांच्या प्रसिद्ध कविता व नाटकातील उतार्यां चा यामध्ये समावेश केला आहे. "'वि. स. खांडेकर दर्शन' या नाटकात लेखकाने खांडेकरांच्या नऊ कादंबर्यां चा आधार घेतला आहे. या कादंबर्यां च्या आधारे खांडेकरांचा लेखन प्रवास कसा झाला हे त्यांच्या कादंबर्यांकतील पात्र घेऊन तो उलगडण्याचा चांगला प्रयत्न या नाटकात लेखकाने केला आहे."