Do Nothing | डू नथिंग

Do Nothing | डू नथिंग
आजच्या काळात, आपण जे काम करतो त्यातून आपल्याला किती ‘समाधान’ मिळतं यापेक्षा ‘मी किती कार्यक्षमतेने काम केलं’ यावरच जीवनाचं मूल्यमापन केलं जातं, जे चुकीचं आहे. ‘वेळ म्हणजेच पैसा’ ही संकल्पना जेव्हापासून लोकांच्या मनात रुजली आहे तेव्हापासून फुरसतीच्या क्षणांचा आनंद घेणंच माणूस विसरून गेला आहे. कार्यक्षमतेच्या मागे लागून माणूस दिवसेंदिवस एकटा पडत चालला आहे, त्यातूनच आजारपण, नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांची शिकार बनत आहे. म्हणूनच या पुस्तकात विरंगुळ्याचे क्षण शोधण्याची आणि रिकामेपणा, काहीही न करणं याला शत्रू न मानता मित्र मानण्याची अभिनव कल्पना मांडण्यात आली आहे या पुस्तकात.