Dollarchya Desha | डॉलरच्या देशा

Dollarchya Desha | डॉलरच्या देशा
वैश्विकीकरणामुळे जग जवळ आलं आहे, असं आपण म्हणत असलो तरी परदेश प्रवासाचं अप्रूप अजूनही आपल्या मनात कायम आहे. त्यातून अमेरिकेसारख्या सुपरपॉवर देशाचा प्रवास करायचा असेल, तर उत्कंठा आणखी वाढते. असा प्रवास करून आलेल्यांच्या कहाण्याही आपण ऐकतो, वाचतो. पण शिरीष कणेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखणीतून उतरलेला अमेरिका प्रवास पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा झाला नसेल तरच नवल! कोणताही चष्मा न लावता केलेला हा प्रवास आहे. अवघ्या दोनशे वर्षांचा इतिहास लाभलेला हा देश वारसा जपत भविष्य घडवीत आहे, असे ते सांगतात. तेथील महागाई, भारतीय समाज खटल्यांच्या गमतीजमती आदी भरगच्च माहितीने हसविणारं हे पुस्तक.