Dongaryatret Disalelya Durgavastu | डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू

Dongaryatret Disalelya Durgavastu | डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू
ऎतिहासिक वास्तूंमध्ये अद्यापही आधुनिक ढवळ न झालेले दुर्ग म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे.’डोंगरयात्रा’या ग्रंथातून गिर्यारोहण व निसर्गानुभुती अशा भुमिकेतून लेखकाने 'दुर्ग’ हा विषय मांडला होता. दुर्ग हि एक ऐतिहासिक वस्तू आहे, तिथे तट-बुरुज-, वाडे-हुडे, देवता,टाक्या, तोफा, शिल्प-स्मारके आहेत. इतिहासा मध्ये घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचे ठसेही तेथे उमटलेले आहेत.या वास्तु काळाच्या ओघात नामशेष होत आहेत. या दुर्गांचे आराखडे फारच कमी उपलब्ध आहेत. फोटोमुळे भूरूप कळते पण वास्तुरचना समजत नाही, आणि म्हणूनच लेखकाने महराष्ट्रातील २८८, गुजरातेतील ६, कर्नाटकातील १,अशा २९५ दुर्गांचे आरखडे या पुस्तकामध्ये देऊन वाचकांसाठी मोठा माहितीचा खजिना उघडा केला आहे.