Dr. Khankhoje | डॉ. खानखोजे

Dr. Khankhoje | डॉ. खानखोजे
लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली डॉक्टरांनी मायदेश सोडला. अमेरिकेत कृषिशिक्षण घेत असतानाच डॉ.खानखोजेंनी क्रांतिकेंद्रे काढली.गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पं. काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते.सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावर घेतली.डॉ. सत यन आणि डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे त्याचे आदर्श होते. म्हणूनच सशस्त्र लढ्यानंतर पंचवीस वर्षे मेक्सिकोत कृषिक्रांती घडवून आणण्यासाठी ते झटत होते.स्वराज्य मिळाल्यावर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी ते मोठ्या उमेदीने मायदेशी परतले. इथे मात्र या महान क्रांतिकारक नि श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञाच्या वाट्याला आली.. त्याचीच ही कहाणी...