Draupadibai Pathan | द्रौपदीबाई पठाण
Draupadibai Pathan | द्रौपदीबाई पठाण
द्रौपदीबाई पठाण ही एक छोटेखानी कादंबरी असून तिची मांडणी लेखिका प्रिया गोगावले यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने केली असून, ती वाचकाच्या मनाचा थरकाप उडवणारी आहे. कादंबरीतील मध्यवर्ती पात्र द्रौपदीबाई आहे. याचे कथानक हे तिच्याभोवती फिरत राहते. तिच्या आयुष्याची फरफट, दुर्दशा कशी होते हे लेखिकेने मांडले आहे. जिवंतपणी तिने केलेला संघर्ष अतिशय प्रत्ययकारी मांडला आहे. समाजातील एक कुरूप आणि विद्रूप बाजू या कादंबरीतून लेखिकेने मांडलेली आहे. समाजातील एक भयानक वास्तव वाचकांच्या डोळ्यासमोर येते. हे कथानक वाचकाला स्वतःबरोबर खेचून नेते हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.