Dubhangalela Jivan | दुभंगलेले जीवन

Aruna Sabane | अरुणा सबाने
Regular price Rs. 356.00
Sale price Rs. 356.00 Regular price Rs. 395.00
Unit price
Dubhangalela Jivan ( दुभंगलेले जीवन ) by Aruna Sabane ( अरुणा सबाने )

Dubhangalela Jivan | दुभंगलेले जीवन

About The Book
Book Details
Book Reviews

एखादा निर्णय चुकीचा ठरतो आणि आयुष्य हातातून पूर्णपणे निसटू लागतं… या परिस्थितीतून काही जण सावरतात तर, काही जण उद्ध्वस्त होतात. ही गोष्ट अशाच उद्ध्वस्तांची आणि सावरलेल्यांचीही… "अनूला तिचं लग्न झाल्यानंतर कळत तिचा नवरा शरद समलैंगिक आहे…. तिचं संपूर्ण भावविश्वच कोसळू लागतं… आणि पुढे आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यांची मुलगी सुचिता बापावरचा हा ‘ठपका’ घेऊन सासरी कायम जाच सहन करत राहते. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याच्या लढाईत एका वळणावर मानसिक आजाराची बळी ठरते. मात्र शलाका तिला एक खंबीर साथ देते आणि त्यातून तिच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळतं… ती सावरते." "हे झालं कादंबरीचं कथासूत्र. पण या कादंबरीतून लेखिका अरुणा सबाने जो कळीचा प्रश्न उभा करतात तो म्हणजे समलैंगिकता समाजमान्य असती तर अनू काय किंवा शरद काय किंवा सुचिता काय… या तिघांच्याही आयुष्याची होरपळ वाचली नसती का? समलैंगिकता आणि मानसिक आजार अशा आजच्या महत्त्वाच्या समस्यांवर आणि निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयांवर थेट पण संयत भाषेत चर्चा करणारी कादंबरी दुभंगलेले जीवन."

ISBN: 978-9-38-945874-9
Author Name: Aruna Sabane | अरुणा सबाने
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 260
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products