Dusara Samana |दुसरा सामना

Satish Alekar | सतीश आळेकर
Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Size guide Share
Dusara Samana ( दुसरा सामना by Satish Alekar ( सतीश आळेकर )

Dusara Samana |दुसरा सामना

Product description
Book Details
Book reviews

दुसरा सामना’ हे सतीश आळेकरांचं १९८९ साली प्रकाशित झालेलं एक वेगळ्या प्रकारचं नाटक आहे असं म्हणता येईल. महाराष्ट्रातील साखर कारखानदारीतील ग्रामीण राजकारणावर आधारित असलेल्या ‘सामना”” या गाजलेल्या चित्रपटाचा उत्तरार्ध म्हणजे हे नाटक असं म्हणता येईल. ‘सामना’ चित्रपटात मारुती कांबळे नावाचं एक पात्र आहे. संपूर्ण चित्रपटात या पात्राभोवती एक गूढ वातावरण तयार केलेलं आहे. चित्रपटातला मास्तर गावच्या सरपंचाला, “मारुती कांबळेचं काय झालं? हा प्रश्न सतत विचारताना दिसतो. या प्रश्नाचं उत्तरच जणू आळेकरांच्या ‘दुसरा सामना” – या नाटकात मिळतं. "सहकारी साखर कारखानदारीतल्या राजकारणाची काळी बाजू चित्रपटात दाखवली आहे तर सहकारी कारखानदारीची जमेची बाजू या नाटकातून समोर येते. शासन आणि प्रशासन याच्यात योग्य समन्वय असेल तर या सहकारी कारखानदारीतून ग्रामीण भागाचा विकास करणं कसं शक्य आहे हेच या नाटकातून आळेकरांनी मांडायचा प्रयत्न केला आहे. सहकार कारखानदारी यातून पश्चिम महाराष्ट्राचा विकास कसा होत गेला. हे समजून घेण्याच्या दृष्टीने हे नाटक महत्त्वाच ठरत."

ISBN: 978-8-19-560931-4
Author Name:
Satish Alekar | सतीश आळेकर
Publisher:
Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
72
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest
Male Characters :
8
Female Characters :
1

Recently Viewed Products