Ego Is The Enemy | इगो इज द एनिमी
Ego Is The Enemy | इगो इज द एनिमी
तरूण प्रतिभाशाली व्यक्तींचे करिअर त्याने सहजपणे विघडवून टाकले! अनेकांची उज्वल भविष्ये यानेच तर धुळीस मिळवली. तो तुमच्यासमोर मोठी प्रतिकूलता, अशक्य वाटणारी आणि सहन करता न येणारी लज्जास्पद स्थिती गती निर्माण करतो. तुम्हाला त्याचं नाव माहिती आहे? अहंकारा हाच सर्वात मोठा शत्रू आहे. आपली महत्त्वाकांक्षा, यश-वैभव तसेच आपल्यातील लवचिकतेचा तो नाश करतो. आपला आंतरिक विरोधक कोण असेल, तर तो अहंकार आहे! जगभरातील जवळ जवळ प्रत्येक संस्कृतीत, कलेच्या प्रांगणात आणि काळाच्या प्रत्येक पावलाबरोबर अनेक कर्तृत्ववान तसेच महान व्यक्तींच्या जीवनकथेत तुम्हाला तो सहजपणे आढळेल.