Ek Asto Builder | एक असतो बिल्डर

Ek Asto Builder | एक असतो बिल्डर
सुधीर निरगुडकर हे एक उल्हासी, उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. 'हात लावेल तेथे यश' असे वरदान काही व्यक्तींना लाभलेले असते. सुधीर निरगुडकर त्यातलेच! मात्र दूरून पाहणी करताना वाटतात तितके हे डोंगर साजरे नसतात. हे यश प्रयत्नपूर्वक, निश्चयपूर्वक आणि आलेल्या विपरीत अनुभवांतून मध्येच माघार न घेता मिळवावे लागते. सुधीर निरगुडकरांना ते कसे साधले आणि उत्तुंग इमारतींची उभारणी कशी केली, तेच 'एक असतो बिल्डर' या पुस्तकात आले आहे.निरगुडकरांची ही शब्दयात्रा अतिशय रोमांचित व वाचनीय आहे. या वाचनीयतेचे श्रेय शोभा बोन्द्रे यांनाही आहे. सुधीरजींनी जे समरसून सांगितले आहे, ते शोभाजींनीही तन्मयतेने शब्दबद्ध केले आहे.