Ek Hota Carver | एक होता कार्व्हर

Ek Hota Carver | एक होता कार्व्हर
शार्ले ग्रॅहॅम आणि लिप्स्कोंब यांच्या इंग्रजीतल्या 'जॉर्ज वॉशिंगटन कार्वर' या नीग्रो शास्त्रज्ञाच्या चरित्राचा वीणा गवाणकर यांनी केलेला मराठी अनुवाद. नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचं गमक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला. हा वस्तुपाठ सजून घ्यायचा असेल तर वीणा गवाणकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं. कार्व्हर यांचा जन्म १८६४चा झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात लहानपणापासूनच रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. अध्यापन केलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. या सगळ्याची ही रसाळ गाथा.