Ek Purn - Apurn | एक पूर्ण - अपूर्ण

Ek Purn - Apurn | एक पूर्ण - अपूर्ण
नीला सत्यनारायण हे नाव महाराष्ट्राला परिचयाचे आहे. त्यांच्यातील संवेदनशील, खंबीर आईचे आणि धडाडीच्या, साहसी स्त्रीचे दर्शन या पुस्तकातून घडते. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या स्वानुभव आहे. एका कुटुंबाने दिलेल्या अग्निदिव्याच्या परीक्षेची कथा आहे. मतिमंद मुलाच्या आईवर झालेला आघात आणि त्या आघातातून सावरताना तिने दाखविलेल्या धैर्याची, प्रगल्भतेची जाणीव या कहाणीतून होते. चैतन्यचा जन्म होतो आणि कुटुंबाचे सारे जीवनच बदलून जाते. तो शरीराने दिसतो, वाढतो सामान्य मुलासारखा. पण त्याची बौद्धिक वाढ त्याला विशेष ठरविते. चैतन्यचे बालपण, संगोपन, शाळा, त्याची प्रगती, यासंबंधी एका आईच्या नजरेतून वाचायला मिळते. अपुरेपणावर मात करून त्याला उमेदीने जगायला शिकवतानाच समाजाकडून अगदी डॉक्टरांकडून मिळवलेल्या अव्हेलनेचे चित्रणही पुस्तकात दिसते.