Eka Ranvedyachi Shodhyatra | एका रानवेडयाची शोधयात्रा

Eka Ranvedyachi Shodhyatra | एका रानवेडयाची शोधयात्रा
हे पुस्तक जंगलातील एका ऋतुखंडातील अनुभवांची गाथा आहे. शैक्षणिक दृष्ट्या वाया गेलेलं एक वर्ष वेगळ्या अर्थाने सत्कारणी लावणार्या एका तरुणाची ही चाकोरीबाहेरची गोष्ट आहे. प्रा. मिलिंद वाटवे यांच्या संशोधनात मदत करण्यासाठी त्यांनी नेमून दिलेले काम करायला लेखक जंगलात दाखल झाला. मदुमलाईच्या घनदाट जंगलात हत्तींचे शेण गोळा करायचे आणि त्यांच्या सुळ्यांची लांबी मोजायचे काम करता करता त्याने जंगलात मुरवून घेतले. ही एक शोधयात्रा आहे. हा शोध केवळ जंगलाचा नाही, जंगल आणि मानव यांच्या नात्याचा आहे. तसेच लेखकाचा स्वत:चा शोध आहे. या पुस्तकात जंगलातील वैशिष्ट्यपूर्ण अशा छायाचित्रांचा समावेश आहे. मुखपृष्ट आणि सजावट पण कलात्मक असल्यामुळे त्याची या पुस्तकाच्या आकर्षकेत भर पडली आहे.