Ekadashavatar Ityadi : Jaliyeli Lanka | एकादशावतार इत्यादी : जाळियेली लंका

Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख
Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Unit price
Size guide Share
Ekadashavatar Ityadi : Jaliyeli Lanka | एकादशावतार इत्यादी : जाळियेली लंका

Ekadashavatar Ityadi : Jaliyeli Lanka | एकादशावतार इत्यादी : जाळियेली लंका

Regular price Rs. 200.00
Sale price Rs. 200.00 Regular price
Unit price
Product description
Book Details
Book reviews

एकादशावतार, बुद्रूकवाडीचा मारुती बाटला आणि जाळियेली लंका या प्राजक्त देशमुख याच्या तीन दीर्घांकांचं हे पुस्तक. प्रयोग मी पाहिले आहेत; या तीनही प्रयोगांमध्ये दिसलेला सामाजिक भाग ही खरंतर प्रयोगाइतकीच लेखनाचीही ताकद आहे. या तीनही दीर्घांकांमधील सामाजिक आशय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सार्वकालिक आहे. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शक या सहितांचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करेल. उत्तम संहितेचं हेच खरं द्योतक आहे. प्राजक्त पुराणातली आपल्या कल्पनेतली पात्रं, आपलं सामाजिक भान अधोरेखित करण्यासाठी वापरत आहे, असं सतत जाणवत राहतं; आणि या तीन दीर्घांकांत तो असं करण्यात यशस्वी झाला आहे. प्राजक्तची समाजाकडे बघण्याची विशिष्ट प्रकारची दृष्टी आहे. त्या दृष्टीत थोडासा तिरकसपणा आहे. आपला मुद्दा मांडत असताना तो आजूबाजूचा परिसर जिवंत करतो, ही त्याची खासियत आहे. ह्या दीर्घांकांत लिहिला गेलेला शब्द हा भवताल, भाषेची गंमत आणि दृश्य घेऊन येतो. आजच्या काळातल्या अतिशय सक्षम अशा नाट्यलेखनाचं हे दीर्घांक एक उत्तम उदाहरण आहेत. हे तीन दीर्घांक वेगळा प्रयोग आणि काळानुसार बदलत जाणारं सामाजिक भान नव्यानं देत राहतील. हे दीर्घांक पुस्तकरूपात येणं ही प्रयोगशील रंगभूमीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
— विजय केंकरे ( ज्येष्ठ दिग्दर्शक) 

ISBN: 9788199394803
Author Name:
Prajakt Deshmukh | प्राजक्त देशमुख
Publisher:
Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:

Binding:
Paperback
Pages:
109
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest
Male Characters :
9
Female Characters :
2

Recently Viewed Products