Ekaki Sugi | एकाकी सुगी

Ekaki Sugi | एकाकी सुगी
पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंध्या उडालेल्या पाहून वाचक विमनस्क होतात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? माधुरोबागन जिथे संपतं तिथूनच ‘एकाकी सुगी’ (अ लोनली हार्वेस्ट - आलवायन) ही कादंबरी सुरू होते. दोन उत्तरार्धांपैकी एक असणार्या या कादंबरीत पोन्ना मंदिरोत्सवातून परत येते आणि कालीने स्वत:ला नैराश्येपायी संपवल्याचं तिला दिसून येतं. त्याने इतक्या क्रूर पद्धतीने शिक्षा केल्याने पोन्ना जरी उद्ध्वस्त होते तरी त्याच्या बरोबरच्या मधुर आठवणींनी ती सतत झपाटलेली असते. या जगाला एकटीने तोंड द्यायला शिकणं तिला भाग असतं. करुणा आणि मार्मिकता यांच्या मिश्रणातून मुरुगन आपल्यासमोर स्त्रियांचा खंबीरपणा आणि आयुष्य पेलण्याची क्षमता यांची सुरेख गुंफण मांडतात.