Ekata Jiv : Dada Kondake | एकटा जीव : दादा कोंडके

Ekata Jiv : Dada Kondake | एकटा जीव : दादा कोंडके
दादा कोंडके - एक हजरजबाबी, विनोदी अभिनेता, द्वयर्थी गीतं-संवाद-लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक..दादांची हीच प्रतिमा जनमानसात रुढ आहे..पण दादा कोंडके म्हणजे एवढंच नाही तर ते एक प्रगल्भ व्यक्तीमत्व होतं. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. जी फार कमी माणसांच्या आयुष्यात आढळते..त्यांचं बालपण, तरुणपण कसं होतं? त्यांच्या जीवनात येऊन गेलेली माणसं कोण होती? त्यांच्याशी त्यांचे नातेसंबंध कसे होते? आणि माणूस म्हणून दादा कसे होते ह्या सर्वांची ओळख प्रस्तुत पुस्तकाद्वारे होते..कारण या पुस्तकातून दादा स्वतःच आपल्या व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्याबद्द्ल मनमोकळेपणानं सांगत आहेत...अशा शुन्यातून स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या एका ‘अवलिया’ व्यक्तीचं हे आत्मकथन..वाचकांना चटका लावून जाते ह्यात शंकाच नाही..