Escape To Nowhere | Spy Stories | एस्केप टू नोव्हेअर | स्पाय स्टोरीज

Escape To Nowhere | Spy Stories | एस्केप टू नोव्हेअर | स्पाय स्टोरीज
भारताच्या ‘एक्सटर्नल इंटेलिजन्स सर्विहस’ अर्थात ‘एजन्सी’च्या सुरक्षा विभागाचा प्रमुख जीवनाथनकडे एकदा एक नवखा, पण हुशार अधिकारी आपला संशय व्यक्त करतो. त्याच्या मते, एजन्सीमधला एक वरिष्ठ अधिकारी परदेशी हेर म्हणून काम करतो आहे. त्यानंतर तातडीने तपास, चौकशी याचं सत्र सुरू होतं आणि संशयित अर्थात, रवी मोहनच्याभोवती सव्हॅलन्सचा जागता पहारा ठेवला जातो… या तपासातून रवी संवेदनशील माहिती चोरत आहे, याला पुष्टी देणारे अनेक तगडे पुरावे समोर येतात. तपास आणि सव्हॅलन्स पुढे चालू राहतो… आणि मग घडते अनपेक्षित अशी घटना, जिचा विचार कुणी कधी केलेला नसतो ! "२००४ साली एक वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी अचानक गायब झाला. तो काही दशकांपासून हेर म्हणून काम करतो असा संशय होता. या सत्यघटनेवर आधारलेली ही कादंबरी देशाची सुरक्षा कर्मचाऱ्यांची नीतिमत्ता ऑपरेशन चालवताना येणाऱ्या मर्यादा यांसारख्या अपरिचित विषयांबद्दल सामान्य माणसाला अंतर्दृष्टी देते."