Estambul Te Kairo | इस्तंबूल ते कैरो

Estambul Te Kairo | इस्तंबूल ते कैरो
निळू दामल्यांसारखा लेखकाच्या दृष्टीला कुठलाही देश जाणवतो तो माणसांच्या रूपात. तो देश त्यांना समजून घ्यायचा असतो म्हणजे माणसं समजून घ्यायची असतात त्या देशातील माणसांची मनं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा- या सगळ्यांतून सामोर्या येणार्या धर्माच्या संकल्पनांच्या अर्थ - जाणिवा. 'इस्तंबूल ते कैरो' मधीलं हे इस्लामिक वास्तवदर्शन अफगाणिस्तानाइतकं दारुण नाही, तरीही इस्लाम म्हणजे शांतता या इस्लामच्या व्याख्येइतकं साधं-सरळही नाही. समाजाची धर्माच्या नावाखाली दुरवस्था होत चाललेली अनुभवताना होणार्या दबक्या, मूक दु:खांच्या वेदना-त्यांच्या छाया - यात जशा आहेत, तसं लोकशाही पद्धतीनं समाजाचा कारभार करता येऊ शकतो याचं भानही आहे; नि दुसरीकडे माणसांवरील धर्माच्या अतिरिक्त वर्चस्वानं त्यांची स्वत:चीच होणारी कोंडीही आहे. ही अस्वस्थता अफगाणिस्तानाइतकी गुंतागुंतीची नसेलही; पण तरी ती एक अस्वस्थता आहेच. फिरस्ती पत्रकारितेच्या माध्यमातून घेतलेला हा शोध आहे - सजीव, प्रत्ययकारी आणि अंतर्मुखतेचा व्यापक अर्थ सांगणारा.