Far Far Varshapurvi | फार फार वर्षांपूर्वी
Far Far Varshapurvi | फार फार वर्षांपूर्वी
भारतासारख्या फार पूर्वीपासून मानवी संस्कृती नांदत असलेल्या देशात पुरातत्व आणि मानव शास्त्रांकडे आपलं खरं तर दुर्लक्षच होतं. दुसरं म्हणजे बरेचदा आख्यायिकांवर आपण जास्त विश्वास ठेवतो आणि ऐतिहासिक सत्य नाकारतो. ऐतिहासिक व्यक्तींना देवत्त्व बहाल करताना ती ही माणसंच असतात हेही आपण विसरतो. प्राचीन मानवाची प्रगती माहीत करून घेण्याच्या ह्या शास्त्रांची तोंडओळखसुद्धा शालेय अभ्यासक्रमात करून दिली जात नाही; ही एक दुर्दैवी घटना आहे.अशा जिज्ञासू व्यक्तींचं हे पुस्तक वाचून अंशतः तरी समाधान होईल; तसेच एका अनोख्या पण मानवी जिव्हाळ्याच्या विषयाशी वाचकांना परिचय होईल.