French Maniac | फ्रेंच मेनिअँक

Pankaj Bhosale | पंकज भोसले
Regular price Rs. 266.00
Sale price Rs. 266.00 Regular price Rs. 295.00
Unit price
French Maniac | फ्रेंच मेनिअँक

French Maniac | फ्रेंच मेनिअँक

Regular price Rs. 266.00
Sale price Rs. 266.00 Regular price Rs. 295.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

स्थळकाळचं भान येण्यासाठी महापुरुषांच्या कथा उपयोगी नाहीत. नगण्य जीवांच्या जगण्यातून, शुल्लक जिंकण्यातून, फालतू पराभवांतून समाज नावाची गोणपाटसदृश वस्तू विणली जाते. 
मुंबई महानगराच्या वेशीवर डोंबिवली-बदलापूरसारखी उपनगरं असतात. त्यात तितकेच सामान्य लोक राहतात महानगराला हलवून टाकेल इतकं कर्तृत्व त्यांच्यात नसतं, ते अंतर्बाह्य 'मिडिओकर' असतात. त्यांच्या आयुष्यावर फ्रेंच पॉर्नस्टारपासून जागतिक सिनेमांपर्यंत गोष्टी आदळतात. तेव्हा हे लोकही बदलतात. पण सामान्यांचे असामान्य होत नाहीत. एकटेपणा, समाजात राहून समाजापासून तुटल्याची त्यांची अवस्था तशीच राहते. 
पंकज भोसलेंनी आपल्या पत्रकारितेत टिपलेल्या व्यक्ती-घटनांवर या कादंबरीचे कथानक बेतलेले आहे. त्यातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा शेवटी विशिष्ठ ठिकाणी जाऊन पोहोचतात. 'मिडिओकर' असण्यास त्यांच्या गंतव्यस्थळाशी संबंध आहे. पण वाचकाला त्यांच्याबद्दल राग येत नाही, कणव येत नाही, आपलेपणाही वाटत नाही. ते तिथे आहेत, आणि त्यांची गोष्ट प्रचंड ऐकण्यासारखी आहे, ही भावना दाटून येते. शिवाय आपलं स्थळकाळाचं भान वाढतं. - आदूबाळ 

ISBN: 9789348521835
Author Name: Pankaj Bhosale | पंकज भोसले
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator:
Binding: Hardcover
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products