Gandharvanche Dene | गंधर्वांचे देणे

Gandharvanche Dene | गंधर्वांचे देणे
प्रज्ञावंत गायक पं. कुमार गंधर्व यांचा भाषा,साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. हे जाणणाऱ्या ग्रंथालीने १९८५ साली त्यांची सलग सहा दिवस मुलाखत - मैफल आयोजित केली होती. हा अभिजात ऐवज अतुल देऊळगावकर यांनी संपादित केलेल्या 'गंधर्वांचे देणे -पं कुमारजींशी संवाद' या पुस्तकाच्या रूपात उपलब्ध होत आहे. "या पुस्तकाला तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. कुमारजींनी या संवादसत्रांतून स्वर-लय-ताल रागसंगीत व त्यातील प्रकार संगीतातील घराणी ऋतुसंगीत व लोकसंगीताचा पैस त्यांनी ऐकलेले पाहिलेले गाणे व त्यांचे गाणे यांवर सविस्तर मांडणी केली होती. यातील विचारांच्या पुष्ट्यर्थ त्यांचे जवळजवळ ५ तासांचे गायन या ग्रंथात दिलेल्या QR कोड्सद्वारे ऐकता येते. या ग्रंथाद्वारे कुमारजींना साक्षात भेटण्याचा प्रत्यय येतो. कुमारजींच्या सरत आलेल्या शताब्दी वर्षातील ही सर्वाधिक महत्त्वाची आणि फार मोठी ऐतिहासिक घटना आहे."