Gandharvgatha | गंधर्वगाथा

Gandharvgatha | गंधर्वगाथा
‘गंधर्वांची गाथा’... कलेवरील निष्ठा, प्रेम, भक्ती, गोड गळा आणि अस्सल सौंदर्याचं लेणं लाभलेले बालगंधर्व म्हणजे अप्सराच! स्वयंवर, मानापमान, शाकुंतल, संगीत सौभद्र, संशयकल्लोळ, कान्होपात्रा, एकच प्याला यांसारख्या संगीत नाटकांचं वैभव त्यांनी महाराष्ट्राला दिलं. कायम जमिनीवर पाय ठेवूनच बालगंधर्व वावरले. कंपनीला कर्ज झालं... मुंबईच्या लाडसाहेबांनी, कराचीच्या लखमीचंदांनी व व्ही.शांतारामसारख्या दयावंतांनी कंपनीस तारले...पण गोहरबाईंच्या हाती कंपनीचा कारभार गेला...आणि बालगंधर्वांच्या कलाजीवनाला आणि लौकिक जीवनालाही ओहोटी लागली...लोकप्रियतेच्या शिखरावरून पायउतार झालेल्या आणि विपन्नावस्थेतील बालगंधर्वांची वणवण मृत्यूनेच थांबवली...मराठी रंगभूमीवर एक देदीप्यमान पर्व साकारणार्या बालगंधर्वांच्या ऐश्वर्यसंपन्न जीवनाची विपन्नावस्थेकडे झालेली वाटचाल!