Gandhiji Ani Tyanche Tikakar | गांधीजी आणि त्यांचे टीकाकार

Gandhiji Ani Tyanche Tikakar | गांधीजी आणि त्यांचे टीकाकार
हे पुस्तक म्हणजे साधना साप्ताहिकातून सुमारे सहासात महिने क्रमाने प्रसिद्ध होत आलेल्या अठरा लेखांचे संकलन आहे.'टीकाकारांची टीका, त्या टिकेमागील त्यांच्या भूमिका, त्या टिकेतले खरेखोटेपण असे सारेच कधीतरी सांगावे, ते सांगताना त्या टीकाकारांना कमी लेखण्याचे साहस करू नये आणि त्यात गुंतलेल्या प्रत्येकच प्रश्नाचे स्पष्ट स्वरूप व त्याविषयी सर्व संबंधितांनी घेतलेल्या भूमिका पुढे याच्या असे मग मनाने घेतले. त्यातून हे लिखाण झाले आहे. हे लेखन परिपूर्ण आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. यातली भूमिका तटस्थ नाही, ती सत्याच्या अधिकाधिक जवळ राहण्याची आहे !' असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.