Gandhinantarcha Bharat | गांधींनंतरचा भारत

Gandhinantarcha Bharat | गांधींनंतरचा भारत
वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथात भारताच्या निर्माणाची करुण तसेच संघर्षमय कहाणी त्यातील सर्व गर्हणीय तसेच उदात्त इतिहास क्षणांचा वेध घेत रामचंद्र गुहांनी सांगितली आहे. आधुनिक भारताच्या जडण-घडणीची कथा जितकी उद्विग्न करणारी आहे तितकीच रसपूर्णही आहे. भारतात वेळोवेळी झालेल्या निरनिराळ्या संघर्षांचे वर्णन रामचंद्र गुहांनी अतिशय ओघवत्या भाषेत केले आहे. त्यातून स्वतंत्र भारताच्या घडणीचा अद्यावत व अर्वाचीन पट आपल्या डोळ्यासमोर नाट्यमय रीतीने उलगडत जातो. असंख्य संघर्षांतूनही भारताला लोकशाहीच्या मार्गाने चालविणार्या प्रक्रियांचा त्यांनी सखोल ऊहापोह केला आहे. भारताचा आधुनिक इतिहास घडविणाऱ्या अगणित व्यक्तिरेखा आहेत त्यांविषयी तसेच सामान्य स्त्री-पुरुषांबद्दल सुद्धा गुहा यांनी या पुस्तकामध्ये लिहिले आहे.