Gandhiparva 2 | गांधीपर्व २

Gandhiparva 2 | गांधीपर्व २
गोविंदराव तळवलकर हे सव्यसाची लेखक, व्यासंगी संशोधक, अभिजात व द्रष्टा इतिहासकार आणि प्रभावी संपादक म्हणून सुविख्यात होते. "भारतीय स्वातंत्र्य लढ्यांच्या १९३७ ते १९४७ या दशकातील इतिहासासंबंधीची कागदपत्रे टुवर्डस् फ्रीडम या ग्रंथमालेत प्रसिद्ध केली आहेत. या दशकात काँग्रेसचेच नव्हे तर सर्व भारताचे राजकारण कशा रीतीने चालत होते याचा तळवलकर यांनी गांधीपर्व या द्विखंडात्मक ग्रंथात जागतिक संदर्भात ऊहापोह केला आहे. महात्मा गांधींचा प्रभाव वाढत जाऊन काँग्रेसने राष्ट्रव्यापी लढा उभारला. काही अधिक पुरावे व पूरक मजकूर देऊन तळवलकरांनी या कालखंडाची वस्तुनिष्ठ तौलनिक व सुबोध मीमांसा केली आहे." "आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासावरील ग्रंथांमध्ये त्रिखंडात्मक सत्तांतर : १९४७ तसेच नवरोजी ते नेहरू नियतीशी करार भारत आणि जग आणि द्विखंडात्मक गांधीपर्व या त्यांच्या ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रवाह आणि प्रवृत्तींचे स्वरूप विशद करतानाच वेगळा विचारही करणे व यापुढील घटनांची व परिवर्तनासाठी काय केले पाहिजे याची कल्पना येणे हा अभिजात इतिहासकाराच्या द्रष्टेपणाचा मोठाच गुण या सर्व ग्रंथांमध्ये अनुभवास येतो. सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त या त्यांच्या चार खंडांतील ग्रंथमालेत आणि बदलता युरोप इत्यादी ग्रंथांमध्येदेखील तो प्रत्ययास येतो. या सर्व ग्रंथांचे हिंदी भाषांतर संवाद प्रकाशन प्रसिद्ध करत आहे."