Gangajali : 4 | गंगाजळी : ४

Gangajali : 4 | गंगाजळी : ४
श्री. बा. जोशी यांचा मराठीइतकाच बंगाली, गुजराती, हिंदी या भाषाजगतात वावर आहे आणि दिसतील तिथून संस्कृतिविशेष टिपण्याची आणि ते दुसर्याला सांगण्याची मर्मग्राही, उमदी रसिकता त्यांच्याकडे आहे. 'गंगाजळी' संग्रह हा सुद्धा नानाविध मनोरंजक विषयांचे कोठार आहे. तुम्हांला जो आवडेल. रुचेल, पचेल तो विषय घ्या. काही ग्रंथांचा उद्देश तत्त्वबोध हा असतो. रंजन हा दुय्यम उद्देश असतो. इथे ग्रंथांचा, सूज्ञांचा, रसिक विद्वानांचा सहवास, त्यातून मिळणारा आनंद हा प्रमुख आहे. निर्हेतुकपणे काही निखळ आनंदाचे क्षण देणे हा गंगाजळीचा प्रमुख उद्देश आहे. आणि म्हणूनच तो ज्ञानप्राप्तीचा सहजयोग आहे. जिज्ञासू रसिकाला तो संग्रही असावा असे नक्कीच वाटेल.