Gangemadhye Gagan Vitalale | गंगेमध्ये गगन वितळले
Gangemadhye Gagan Vitalale | गंगेमध्ये गगन वितळले
'हिंदुस्थानची फाळणी करण्याचा हक्क इंग्रजांना नाही, हे आपण सगळ्यांनी संघटितपणे आणि स्वच्छपणे सांगून टाकले पाहिजे. बळाचा वापर करून पाकिस्तान होणार नाही. हिंदुस्थानची राख झाली तर ते मी एखाद वेळी सहन करीन, परंतु बळजबरीने पाकिस्तान मिळणार नाही.' पुढे १ जूनच्या रोजनिशीत त्या लिहितात - बापूजींना वाटतंय - 'स्वातंत्र्याची पावलं उलटी पडताहेत असं मला वाटतं. स्वतंत्र भारताचं भविष्य चांगलं आहे, असं मला वाटत नाही. ते सगळं पाहण्यासाठी मला जिवंत ठेवू नकोस, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो आहे. 'गंगेमध्ये गगन वितळले' या पुस्तकातला हा भाग वाचण्यासारखा आहे.