Gaon Tethe Dev | गाव तेथे देव

B. D. Kher | भा. द. खेर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Gaon Tethe Dev ( गाव तेथे देव ) by B. D. Kher ( भा. द. खेर )

Gaon Tethe Dev | गाव तेथे देव

About The Book
Book Details
Book Reviews

आंबेगाव हे कोकणातील एक छोटंसं गाव. शिवाजीराव भोसले हे गावातील प्रतिष्ठित जमीनदार. पिढीजात किती जमीन त्यांच्या नावाने आहे.आंबेगावातभोसल्यांचं पुढाकाराचं घराणं सर्वांत जुनं. ब्राह्मणाची चार घरं बाकी सर्व गाव मराठ्यांचा व कुळवाड्यांचा. पण कुणी मोठा नाही कुणी धाकटा नाही. सगळे एकोप्यानं राहत. पोटापाण्याचा प्रश्न आला, तर गावकरी शिवाजीरावांकडे धाव घेत. दैवी संकट आलं की त्र्यंबकगुुरुजींकडे जात. शंकराच्या देवस्थानाची देखभाल करणाऱ्या पुरोहित त्र्यंबक गुरुजींना दोन मुलं- दोन मुली. त्यांतील मोठा श्याम हा शेती बघत असे. त्र्यंबक गुरुजींच्या पाठीवर १७ वर्षांनी झालेल्या श्रीधरला शिक्षणात गती होती. पण गावात कॉलेज नव्हतं. बाहेरगावी जायची गावची पद्धत नव्हती. मग शिकवण्या घेऊन त्याने आपला जम बसवला. सिंधूबरोबर लग्न झालं. सुखासमाधानानं तीन वर्षं संसार केला; पण एका मुलाला जन्म देऊन तिचा मृत्यू झाला. या आईवेगळ्या मुलाचं- जगन्नाथाचं घरात सर्व जण मायेनं लालन पालन करत. सिंधू नसलेल्या घरात श्रीधरचं मन रमेना. आंबेगाव सोडून श्रीधरने दुसरीकडे नोकरीस जाण्याचे ठरवले. इकडे शिवाजीरावांनाही आपल्या दोन मुलांच्या अपमृत्यूचा धक्का सोसावा लागला; पण मुलगी जान्हवीच्या हट्टाने आता गावात हायस्कूलचीही सोय झाली. जगन्नाथ आणि जान्हवी बरोबरीने शाळेत जात होते. आता शंकररावांच्या इच्छेविरुद्ध व गावाच्या रीतीविरुद्ध दोघांनी पुण्याला कॉलेजला प्रवेश घेतला. जान्हवीच्या आजीकडे आई पुतळाच्या माहेरी ती राहू लागली. जगन्नाथ हॉस्टेलवर राहू लागला. दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण झाल्या. जान्हवीच्या आजीलाही हा हुषार जगन्नाथ नातजावई म्हणून आवडला. दरम्यान शंकररावांचा अकस्मात मृत्यू झाला. दोघांच्या कुटुंबांचा कितीही घरोबा असलातरी हा जातीपातीविरुद्ध केलेला विवाह पसंत पडणे शक्य नव्हते पण शहराचे पाणी प्यायलेल्या आजीच्या पाठिंब्याने हा विवाह पार पडला. आजीच्या ओळखीमुळे व समाजातील दबदब्यामुळे शब्द टाकताच जगन्नाथला बँकेत मोठ्या पदावर नोकरीही मिळाली. श्रीमंत आजीने लग्नाची भेट म्हणून नवा बंगलाही नातीला व नातजावयाला दिला. जगन्नाथाच्या घरचे मात्र या सगळ्या घटनांमुळे त्याला दुरावले. मनोमन जगन्नाथ या सगळ्यामुळे थोडा दुःखी झाला होता मात्र त्याला आता पाऊल मागे घेता येत नव्हते. परिस्थितीच्या विचित्र कैचीत तो अडकला होता. जान्हवीच्या खर्चीक स्वभावामुळे जगन्नाथची तिला पैसे पुरवण्यात तारांबळ उडू लागली. बँकेतही आडमार्गाने पैसा मिळवण्यासाठी तो उद्युक्त झाला. आपण करतो ते बरोबर नाही, हे कळूनही तो परिस्थितीपुढे हतबल झाला. नोकरी गमावण्याची वेळ त्याच्यावर येऊन ठेपली. त्यातच बँकेचे अधिकारीही जाब विचारायला पोलिसांना घेऊनच आले... काय घडले त्यानंतर... जगन्नाथ या संकटातून बाहेर आला का? कोणी मदत केली का? बापू आणि जान्हवीचा झगडा संपला का?

ISBN: 978-9-39-425889-1
Author Name: B. D. Kher | भा. द. खेर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 170
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products