Gatha Bant Singhachi | गाथा बंत सिंहची
Gatha Bant Singhachi | गाथा बंत सिंहची
दुर्दम्य अशावादाने जगणार्या बंत सिंह या पंजाबी माणसाची ही कहाणी आहे. तशीच; ती अन्याय, अत्याचाराने दबून न जाता त्या राखेतून उठणार्या सामर्थ्याचीही कहाणी आहे.बंत सिंहच्या बाबतीत स्वत:वर आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या क्रूर अशा अत्याचारानंतर थोडेदेखील डगमगून न जाता त्यातूनही बाहेर पडून नव्याने जीवन जगण्याची उमेद, जिद्द यांची रोमांचक कथा या पुस्तकात चित्रित झालेली आहे.पंजाबच्या दलित आणि क्रांतिकारी इतिहासाचा साहित्याचा मागोवा घेत लेखिका निरुपमा दत्त आपल्याला बंत सिंह यांच्या आयुष्याची कथा सांगतात. भारतीय समाजव्यस्थेचे दर्शनही पुस्तकातून प्रतीत होते.