Gautam Buddhanche Charitra | गौतम बुद्धांचे चरित्र

Gautam Buddhanche Charitra | गौतम बुद्धांचे चरित्र
इ. स. १८९८ साली प्रसिद्ध झालेले गौतम बुद्धांचे चरित्र हे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी लिहिलेले मराठी भाषेतले पहिले बुद्धचरित्र आहे. स्थूल मानाने १२५ वर्षांपूर्वी मराठी भाषेत पहिल्यांदाच महामानव गौतम बुद्धांचा परिचय करून देण्याचे फार मोठे श्रेय केळूसकर यांना द्यावे लागते. कृ. अ. केळूसकर हे गेल्या शतकातील मोठे विचारवंत, प्रसिद्ध चरित्रकार होते. गौतम बुद्ध, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषांचे ते मराठी भाषेतील पहिले महत्त्वाचे चरित्रलेखक होत.या ग्रंथात गौतम बुद्धांच्या जन्मापासून त्यांचे बालपण, संसाराचा त्याग, मोक्षप्राप्तीच्या मार्गाचा शोध, ज्ञानप्राप्तीनंतरचे धर्मोपदेश, बुद्ध धर्माची स्थापना, धर्माचा बोध देण्याविषयक त्यांचे कार्य, लोकांना दिलेले मानवी धर्माचे ज्ञान व धर्मप्रसार अशा प्रकारे या अलौकिक धर्मसंस्थापकाने केलेल्या कार्याची माहिती १० भागात देऊन बुद्धांचे चरित्र वर्णन केले आहे.