Geetramayan Kavya Navhe Ha Amrutsanchay | गीतरामायण काव्य नव्हे हा अमृतसंचय

Geetramayan Kavya Navhe Ha Amrutsanchay | गीतरामायण काव्य नव्हे हा अमृतसंचय
गीतरामायण हा महाराष्ट्राच्या सांगीतिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. त्याचप्रमाणे गीतरामायणाचे जनक ‘गदिमा’ हे नावही जादुई आहे. माडगूळकरांच्या लेखणीतून उरलेल्या गीतरामायणाने आजच्या पिढीलाही मोहवून टाकले आहे. मुकुंद सराफ यांनी या पुस्तकात गीतरामायणातील गीते देऊन त्यांचा अर्थ सांगितला आहे.अर्थ सांगताना संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेचं बाबूजींची कामगिरी, संबंधित गीताचे गायक अथवा गायिका, ते गीत कोणत्या रागात आहे. आदी माहितीही दिली आहे. काही गीतांसंबंधातील किस्सेही वाचायला मिळतात. पुस्तकात गीतरामायणातील सर्व म्हणजे ५६ गीतांचे विवेचन दिले आहे. गीतांवर आधारित असलेल्या चित्रांचा समावेशही पुस्तकात आहे.