Gharandaj Gayaki | घरंदाज गायकी

Gharandaj Gayaki | घरंदाज गायकी
संगीतातील घराणी हा विषय सर्व गायकांच्या इतका जिव्हाळ्याचा असूनही त्याची साधकबाधक चर्चा सहसा केली जात नाही किंवा त्यावर फारसे कोणी लिहीतही नाही. एका दृष्टीने हे विषय हाताळणे जरा अवघड आहे. त्यात अनेक प्रकारचे महत्वाचे आणि गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित होतात. घराणी म्हणजे काय? त्यांचे वैशिष्ट्य अथवा गुणदोष कोणते? त्यांच्या मर्यादा काय? ती कशी व का निर्माण होतात? त्यांचे काही अंतर्गत कायदे असतात किंवा कसे? व तसे असल्यास त्यातील काही आपणास सांगता येतील किंवा काय? -- वगैरे अनेक प्रश्नांचा उहापोह त्यात व्हायला पाहिजे. या उद्देशानेच प्रस्तुत विषय विचाराकरिता घेतला असून त्यांत सर्व गायकांचे लक्ष या प्रश्नांकडे वेधावे एवढाच हेतू आहे.