Ghatsutra | घातसूत्र

Ghatsutra | घातसूत्र
दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलीकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन प्रबोधन करणारा, पण एक उत्कंठापूर्ण, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. "टायटॅनिक जहाज बुडाले की बुडवले? म्हणजे तो एक अपघात होता की घातपात? १९१२ साली झालेल्या अपघात (की घातपात) ते १९१६ साली अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रंप विराजमान होणे या शतकभराच्या कालखंडात जागतिक पातळीवर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांमागील पाताळयंत्र शोधण्याचा प्रयत्न 'घातसूत्र' या कादंबरीत करण्यात आला आहे. आपण जे जगतो आहोत ते स्वतंत्रपणे जगत आहोत की कुणीतरी आपल्याला बुद्धिबळाच्या पटावरील सोंगट्यांप्राणे मागे-पुढे जायला लावत आहे असा विचार करायला लावणारे वेगवान शैलीत लिहिलेले अप्रतिम पुस्तक आहे."