Gidhade |गिधाडे

Gidhade |गिधाडे
गिधाडे हे नाटक प्रथम सादर झालं तेव्हा त्यातली हिंसक प्रवृत्तीची, एकमेकांच्या जिवावर उठलेली शिवराळ माणसं ही तेंडुलकरांच्या विकृत कल्पनेतली पात्रं आहेत, प्रत्यक्षातल्या जगण्याशी यांचा संबंध नाही, असं म्हटलं गेलं. काही जाणकारांनी मात्र हे भविष्यवेधी नाटक आहे, असं म्हटलं. आणि तेच खरं ठरलं. यातली रमाकांत, उमाकांत, माणिक आणि पप्पा ही परस्परांचे लचके तोडणारी अर्थलोलुप वासनांध, मदांध माणसं ही आजच्या पराकोटीच्या चंगळवादी जगण्याची प्रतिकं बनून गेली आहेत. अनैतिकतेच्या निसरड्या वाटांवरून धावत सुटलेली, आताचा क्षण सेलिब्रेट करण्याच्या ध्यासाने पछाडलेली आणि जगण्यातली सगळी कोवळिक बेमुरव्वतपणे खुडून काढणारी अतोनात स्वार्थी जमात हीच आजच्या मानवप्राण्याची ओळख बनत चालली आहेत. तेंडुलकरांची ‘गिधाडे’ हा तिचा सूक्ष्मदर्शकाखाली धरलेला एक पापुद्रा आहे.