Gone Girl | गॉन गर्ल

Gone Girl | गॉन गर्ल
२०१२ मध्ये प्रकाशित झालेलं ‘गॉन गर्ल’ हे गिलियन फ्लिन या लेखिकेचं पुस्तक चांगलंच गाजलं. या कादंबरीतील मुख्य रहस्य हे त्याचा नायक निक् आणि त्याच्या पत्नीच्या बेपत्ता होण्यात असणारा सहभाग यातून निर्माण होतं. लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी अॅमी बेपत्ता होते; पण निकच्या नेमक्या भावना काय आहेत- दुःख ,भीती, निराशा की आणखी काही?... अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेला, लोकांच्या तिरस्काराला बळी पडलेला निक् मीडियाने उभ्या केलेल्या वादळाला तोंड देऊ शकेल? अॅमीला शोधून परत आणू शकेल? आहे कुठे अॅमी..? अनेक धक्कादायक वळणांनी भरलेली ही कथा एका भरकटलेल्या, घसरणीला लागलेल्या संसाराची कहाणी सांगते. अशी रहस्यमय कथा जिचा शेवटही तिच्या आरंभाइतकाच गूढ आणि वेदनादायी आहे.