Goshti Deshantarichya | गोष्टी देशांतरीच्या

Goshti Deshantarichya | गोष्टी देशांतरीच्या
१९६३ मध्ये वसंत बापट यांना वर्षभर भारतभ्रमण करता यावे यासाठी राष्ट्र सेवादलाने सर्व सुविधा पुरवल्या होत्या. त्यातून आकाराला आलेले लेख ‘लोकसत्ता’ दैनिकात प्रसिद्ध झाले, नंतर त्यांचेच ‘बारा गावचं पाणी’ हे पुस्तक १९६६ मध्ये आले. त्यानंतर १९९० दरम्यान त्यांनी कोकण, राजस्थान, हिमालय, नेपाळ या प्रदेशांत भ्रमंती केली, त्यावर आधारित लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले आणि नंतर त्यांचेच ‘अहा, देश कसा छान!’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी अमेरिका व ऑस्ट्रेलिया दौरे केले, त्यावरील लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले, नंतर ते पुस्तकरूपाने ‘गोष्टी देशांतरीच्या’ या नावाने आले. ही दोन्ही पुस्तके १९९७ मध्ये साधना प्रकाशनाकडून आली होती. मागील काही वर्षे वरील तिन्ही पुस्तके आऊट ऑफ प्रिंट होती. आधीच्या आवृत्त्यांमधील सर्व मजकूर नव्या आवृत्त्यांमध्ये जसाच्या तसा घेतला आहे, मुखपृष्ठे तेवढी बदलली आहेत. ही तिन्ही पुस्तके एकत्रित वाचली आणि नंतर प्रवासाच्या कविता (मौज प्रकाशन) हे चौथे पुस्तके वाचले तर, वसंत बापट यांचे व्यक्तिमत्त्व कळण्यास खूप उपयुक्त ठरेल.