Grafiti Wall | ग्राफिटी वॉल

Grafiti Wall | ग्राफिटी वॉल
मनाला वाटतं ते वाट्टेल तसं मोकळेपणानं लिहिण्याची जागा म्हणजे ग्राफिटी वॉल .तत्पुरुष, धुळीचा आवाज, मृगजळीचा मासा हे कवितासंग्रह आणि ब्र,भिन्न या कादंबर्या लिहिणार्या कविता महाजन... संवेदनशील लेखिका कविता यांच्याकडे आपल्या अनुभवांना या सार्यांतून वाट दाखवूनही, दुसर्याला सांगण्याजोगं त्यांच्याकडे बरंच शिल्लक उरलं. कविता आणि कादंबरी यात न सामावलेले अनेक लहानमोठे अनुभव, विचार, भावना आणि छोटामोठा प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी, तत्काळ व्यक्त होण्याची जागा म्हणून, लोकप्रभा साप्ताहिकाच्या माध्यमातून दर आठवड्याला त्यांनी ग्राफिटी वॉल खरडली- रंगवली.त्याचेच हे पुस्तकरूप सादरीकरण.