Gruhabhanga | गृहभंग

Gruhabhanga | गृहभंग
गृहभंग ही स्वातंत्र्यपूर्व भारतात 1920 ते 1940 सालादरम्यान घडणारी कादंबरी. याचं कथासूत्र एका चारी बाजूंनी समस्यांनी ग्रासलेल्या महिलेच्या, नंजम्माच्या संघर्षाभोवती फिरतं. मूर्ख नवरा, खाष्ट सासू, अंधश्रद्धाळू शेजार आणि भीषण गरिबी अशी ओढाताण सहन करत नंजम्माचा जीवनसंघर्ष सुरू आहे. नंजम्माची सासू प्रत्येक दुर्दैवाला नंजम्माला जबाबदार धरते. नवरा घराची जबाबदारी नाकारतो. अशात आपल्या निर्भेळ स्वभावानं आणि धैर्यानं नंजम्मा परिस्थितीवर मात करू पाहते. आत्मनिर्भरपणे उभं राहत असतानाच आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि चांगले संस्कार देण्यास धडपडते. मानवी मनाच्या अतर्क्य व्यापारांमुळे आणि नियतीच्या घावांमुळे घायाळ झालेल्या नंजम्माची हदयाला पीळ पाडणारी कथा.