Gugali | गुगली
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Gugali | गुगली
About The Book
Book Details
Book Reviews
अभिनेते लेखक नसतात. असावे असे नाही. तसे नाही यात काही वावगे नाही. कारण अभिनय आणि लेखन ही भिन्न क्षेत्रे आहेत. तथापि शब्दांची फेक अभिनयाच्या भावनेतून करताना जी रसनिष्पत्ती करावी लागते ती करताना केव्हा केव्हा त्या साहित्यातील शब्दांचा स्पर्श नटाला होतो आणि त्याचा लेखक होतो. मराठी साहित्यात कै.चिंतामणराव कोल्हटकरांपासून (बहुरूपी) हे पर्व आरंभले. आणि त्यात आता लोकप्रिय विनोदी नट दिलीप प्रभावळकर हे सामील झाले आहेत. त्यांचे गुगली हे अंदाजे दीडशे पानांचे अतिशय अन्वर्थक मुखपृष्ठ असलेले अचूक गोलंदाजीचे पुस्तक याचे रोचक प्रात्यक्षिक होय.