Gulamraja | गुलामराजा

Gulamraja | गुलामराजा
पहिल्या महायुध्दामुळे जगात मोठ्या प्रमाणात आर्थिक बदल झाले. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतात औद्योगिक आयोगाची स्थापना केली. त्यामुळे भांडवलदारांची ताकद वाढली. त्यांनी उद्योगवाढीसाठी राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली. ब्रिटिश सरकारशी जुळवून घेतले. या नव्याने उद्यास आलेल्या भांडवदार वर्गाची प्रतिनिधी म्हणजे टाटा कंपनी. टाटांचे सरकारशी आणि राजकीय पुढार्यांशी असलेले संबंध त्यांना उपकारकच ठरले. "मुळशी सत्याग्रह धरणाच्या विरोधातला भारतातील पहिला लढा. त्याला आता शंभर वर्ष झाली. अहिंसक मार्गाने अशा स्वरूपाचा एवढा दीर्घ काळ चालणारा हा जगातील पहिला लढा. तो राजकारणापासून अलिप्त राहिला नाही. जहाल आणि मावळ ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा वादांत हा सत्याग्रह अडकला. त्याला वर्गयुध्दाचे स्वरूप प्राप्त झाले. त्याचे चित्र भांडवलदार विरुध्द शेतकरी असे दिसू लागले. पुढे शंभर वर्षांत भारतात शेतकरीवर्ग कमी होत गेला आणि कामगारवर्ग वाढत गेला. भांडवलदारांच्या मर्जीवर जगणारा गुलाम झाला. भारतातील शेतकर्यांचा मागील शंभर सव्वाशे वर्षांतील हा प्रवास म्हणजे मुळशी सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवरील गुलामराजा ही कथा. टाटा कंपनीचे साम्राज्य जगभर वाढले; पण ज्यांच्या जमिनीवरून त्याची सुरुवात झाली ते धरणग्रस्त शेतकरी आज कुठे आहेत? ही कथा वाचल्यावर हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही."