Gunakari Ahar | गुणकारी आहार

Gunakari Ahar | गुणकारी आहार
फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, सुकामेवा व इतर अन्नपदार्थात अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात. परंतु एखाद्या जादूसारखे परिणाम करणारे त्यातील जे सुप्त गुण ते आपल्याला कुठे माहीत असतात? सुप्रसिध्द निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. बाखरू यांनी सखोल अभ्यास करून ही माहिती तपशीलवार व सामान्यजनांना सहज उपयोगी पडेल अशा पध्दतीने या पुस्तकात दिली आहे. प्रत्येक अन्नपदार्थाची सर्वसाधारण शास्त्रीय माहिती, त्यातील अन्नमूल्ये, त्याचे औषधी गुणधर्म आणि मुख्यत: हे अन्नपदार्थ कोणकोणत्या आजारावर उपयुक्त आहेत व त्यासाठी त्यांचा वापर कसा करावा; या सर्वांबाबतची परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे.