Gundyabhau | गुंड्याभाऊ

Gundyabhau | गुंड्याभाऊ
चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही जोडगोळी मराठी साहित्यात अजरामर ठरली आहे. चिं. वि. जोशी हे सरळ मनाच्या व्यायामप्रेमी गुंड्याभाऊचे जनक. त्यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे.बडोदा कॉलेजातील पदार्थविज्ञानाचे त्या वेळेचे अध्यापक प्रो. नारायण काशिनाथ आपटे यांच्या व्यक्तीमत्वावर 'चिविं'नी हे पात्र बेतले होते. व्यायामप्रेमी, परोपकारी आणि निर्भय वृत्ती ही गुंड्या भाऊंची वैशिष्ट्य.वशिला लावण्याची सक्त मनाई, कोणाला कशाची भ्या?, प्रगती पुस्तक, सुमनचे सामाजिक संशोधन, मोटार उड्डाण,बौद्धिक विवाह आदि कथांतून गुंड्याभाऊंनी धमाल उडवली आहे. निखळ, शाब्दिक विनोद ही या कथांची खासियत.थोडे वास्तव अन थोडी अतिशयोक्ती यांचे बेमालूम मिश्रण केलेल्या या फर्मास कथा..