Guntavanukiche Manasashastra | गुंतवणूकीचे मानसशास्त्र

Guntavanukiche Manasashastra | गुंतवणूकीचे मानसशास्त्र
बचतीचा आणि गुंतवणुकीचा विषय सुरू झाला, की बहुतेकांचा गोंधळ उडतो. नक्की किती आणि कशी बचत करावी, गुंतवणूक नक्की कोठे करावी, यांसारखे प्रश्न त्यांना सतावत असतात. दुर्दैवाने यासंबंधी दिला जाणारा सल्ला हा पूर्वग्रहदूषित आणि जुन्या समजुतींवर आधारित असतो. जस्ट कीप बाईंग या पुस्तकात लेखकांनी दिलेला सल्ला हा पूर्णपणे आकडेवारीवर आधारित शास्त्रोक्त सल्ला आहे. या पुस्तकात दिलेल्या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वत:चा गुंतवणुकीचा आराखडा तयार करू शकता आणि दीर्घकाळात संपत्ती निर्माण करू शकता. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की अर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वाटते तेवढी बचत करण्याची गरज नसते. शिवाय प्रत्येक वेळी गुंतवणूकीसाठी शेअर बाजार पडण्याची वाट बघायची आवश्यकता नसते. बाजार कोसळल्यानंतर आपण त्यातून तरून कसे जायचे हेदेखील तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनाने लक्षात येईल.