Guru Viveki Bhala | गुरु विवेकी भला

Guru Viveki Bhala | गुरु विवेकी भला
गुरु आणि शिष्याचे नाते हे कोणत्याही संस्कृतीतले एक मनोरम्य नाते आहे. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राद्वारे भारतीय मानसशास्त्रात अमूल्य योगदान दिलेले कि. मो. फडके यांच्याबरोबरच्या गुरु शिष्य नात्याचा हृदय प्रवास अंजली जोशी यांनी गुरु विवेकी भला या पुस्तकात रेखाटला आहे, जो मराठीमध्ये अत्यंत अभिनव आहे. गुरूला समजून घेण्याचा स्वतःला समजून घेण्याचा व त्याचबरोबर गुरु शिष्य नात्यालाही समजून घेण्याचा हा प्रवास आहे. या प्रवासात गुरु विद्यादान कसे करतो हे तर समजतेच, पण त्या जोडीने गुरूच्या मानसिक विश्वाचा मानसशास्त्रीय नजरेतून कसा वेध घेतला जाऊ शकतो, यावरही प्रकाश पडतो.